कंपनीतील चार कर्मचाऱ्यांकडून पावणेसात कोटींची फसवणूक

मथु के. नरसिंव्हा, बाळासाहेब डोके, निलेश कदम, ज्ञानेश्वर गुळींग, संचालक गंगा आयर्न अँड स्टील ट्रेडिंग कंपनी लिमिटेड, मुंबई, संचालक सुदर्शन फोर्ज अँड स्टील वल्र्ड पिंपरी, संचालक प्रिती इंटरनॅशनल (गोपाल ओ रुइया एचयुएफ) मुंबई, संचालक रुइया अलॉय प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पिंपरी:  कंपनीतील चार कर्मचाNयांनी संगनमताने मालाचा पुरवठा केल्याचे दाखवून त्यासाठी खोटे इनवॉईस बील, बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे दोन वर्षांच्या कालावधीत वंâपनीची तब्बल ६ कोटी ८३ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार भोसरी-प्राधिकरण येथे उघडकीस आला आहे.

    मथु के. नरसिंव्हा, बाळासाहेब डोके, निलेश कदम, ज्ञानेश्वर गुळींग, संचालक गंगा आयर्न अँड स्टील ट्रेडिंग कंपनी लिमिटेड, मुंबई, संचालक सुदर्शन फोर्ज अँड स्टील वल्र्ड पिंपरी, संचालक प्रिती इंटरनॅशनल (गोपाल ओ रुइया एचयुएफ) मुंबई, संचालक रुइया अलॉय प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यानंद सुर्यानाथ सिंग (वय ६२, रा. दहिसर ईस्ट, मुंबई) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    आरोपी मथु, बाळासाहेब, निलेश आणि ज्ञानेश्वर हे फिर्यादी सिंग यांच्या सिंग अँड सन्स फर्म या कंपनीत काम करत होते. त्यांनी अन्य आरोपींसोबत मिळून सन २०१८ ते २०२० या कालावधीत लोखंडी मालाचा पुरवठा केल्याचे दाखवून त्याबाबत खोट्या टीसी, खोटे इनवॉईस बिल आणि बनावट कागदपत्रे बनवून फिर्यादी यांच्या वंâपनीची ६ कोटी ८३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ तपास करत आहेत.