ajit pawar

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांची खोटी सही(duplicate signature) करून खाजगी सचिव असल्याचे भासवून बिल्डरची फसवणूक(fraud) करणाऱ्या तोतयाला पोलिसांनी अटक(arrest) केली आहे. तुषार तावरे असे अटक केलेल्याचे नाव आहे.

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांची खोटी सही(duplicate signature) करून खाजगी सचिव असल्याचे भासवून बिल्डरची फसवणूक(fraud) करणाऱ्या तोतयाला पोलिसांनी अटक(arrest) केली आहे. तुषार तावरे असे अटक केलेल्याचे नाव आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.

मुंबईतील बांधकाम व्यावसायिक अजय कामदार यांना आरोपी तुषार तावरे याने दिनांक १४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधीन “मी उपमुख्यमंत्री यांचे कार्यालयातुन बोलत असून अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आपल्या विरुद्ध तक्रार आली आहे. मी तुम्हास व्हॉट्सॲपला पाठविली आहे ती बघा .”असे सांगितले त्यानंतर कामदार यांनी हे व्हॉट्स ॲपचे मेसेज व तक्रारी अर्ज पाहिले असता त्यांच्या बांधकाम व्यवसाया संदर्भात तक्रारी अर्ज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे देण्यात आल्याचे दिसले .

त्या अर्जावर उपमुख्यमंत्री पवार यांनी तात्काळ कारवाई करावी ,असा पोलीस उपायुक्त झोन – ९ मुंबई ,सहा पोलीस आयुक्त झोन – ९ मुंबई , व वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एन नगर पोलीस स्टेशन मुंबई यांना रिमार्क मारून त्या खाली उपमुख्यमंत्री पवार यांची सही असल्याचे दिसले. त्यामुळे कामदार यांनी घाबरून आरोपी नामे तुषार तावरे याला संपर्क साधला असता, तावरे याने कामदार यांना “तुमच्या विरुध्द दिलेला अर्ज मी कमिश्नरकडे न पाठवता माझ्याकडे ठेवला आहे.तुमचे व अर्जदार यांचे जे वाद आहेत ते तीन दिवसात मिटवून घ्या, नाहीतर आपल्या विरूध्द कडक कारवाई होईल”, अशी भीती कामदार यांना घातली. दरम्यान कामदार यांनी घाबरुन उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयास संपर्क साधुन सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी तुषार तावरे नावाचा कोणीही व्यक्ती कार्यालयात काम करीत नाही, आपण अजित उद्या बारामतीत आहेत. आपण त्यांना जावुन सर्व प्रकार सांगा असे कामदार यांना सांगण्यात आले. त्यामुळे कामदार यांनी बारामतीत येवून स्वीय सहाय्यक सुनिल मुसळे यांची भेट घेतली. मुसळे यांच्या सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी कायदेशीर कारवाई करा, असे सांगितले .त्यानुसार कामदार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरगावकर यांची भेट घेवून तावरे याच्याविरुध्द तक्रार दाखल केली,त्यानुसार तुषार तावरे याच्याविरुध्द भा.दं.वि. कलम ४१७, ४१९,४२०, ४६४,४६८,५११ अन्वये तोतयागिरी करून फसवणूक केल्प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास पो.उप.निरीक्षक गंपले करीत आहेत.

तुषार तावरे अगर अशा कोणत्याही व्यक्तीने तोतयागिरी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक /खाजगी सचिव अगर कार्यालयातील अधिकारी असे सांगुन फसवणूक केली असेल ,तर बारामती शहर पोलीस
स्टेशन येथे संपर्क साधावा. – नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी