आरोग्य शिबिरात २९६ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, भारतीय जनता पार्टी पुणे शहर,आनंदवन बहुउद्देशीय संस्था, पुणे महानगरपालिका, श्री गुरुदत्त सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर परिसरातील १२०२ दत्त वसाहतीत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

 श्री गुरुदत्त सेवा मंडळ यांच्यातर्फे आयोजन

पुणे :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, भारतीय जनता पार्टी पुणे शहर,आनंदवन बहुउद्देशीय संस्था, पुणे महानगरपालिका, श्री गुरुदत्त सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर परिसरातील १२०२ दत्त वसाहतीत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये २९६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी आरोग्य तपासणी व मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप पुणे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, रा. स्व. संघाचे डॉ.अमोघ देशपांडे, आनंदवन बहुउद्देशीय संस्थेचे डॉ.अजय दुधाणे, डॉ.गार्गी गवाणकर, पॅथोलॉजिस्ट किशोर कारळे, जयंत गोखले, राहुल भोर, संजय एडके, गौरव पळशीकर,समीर खरे यांनी तपासणी व नियोजन केले.  
पुणे मनपा आरोग्य खात्याचे सुनील कांबळे, निलीमा काकडे, दत्तात्रय सोनार, प्रकाश पवार, विनोद चव्हाण, विशाल धुमाळ, निखिल कदम, सागर पांचाळ, योगेश मोरे, अविनाश पवार, दत्ता साळवी, गणेश खेंगरे, अमित शिंदे, मनोज चव्हाण, विवेक कदम, महेश वाडेकर, आदींनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.
-आरोग्य जपणे हे सर्वात महत्त्वाचे काम
डॉ.अजय दुधाणे म्हणाले, सध्याच्या काळात आरोग्य जपणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. परंतु सर्वांनाच आरोग्य तपासणी करणे शक्य होत नाही. यासाठी आनंदवन बहुद्देशीय संस्थेतर्फे शिवाजीनगर परिसरातील दत्त वसाहतीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोवीड-१९ आजार लवकर आटोक्यात आणण्यासाठी वारंवार आरोग्य तपासणी शिबिरे होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.