कुपोषण आणि भूकबळी पासून मुक्तता देशासमोर असलेल मोठे आव्हान – डॉ.नीलम गोऱ्हे

महाविद्यालयातील होम सायन्स या विषयातील विद्यार्थीनी आज देशभर नव्हे तर जगभर कार्यरत आहेत. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थींनीसाठी एमएससी क्लिनिकल पोषण आणि आहार तज्ञ प्रयोगशाळा भविष्यात विद्यार्थ्यांना नक्कीच लाभदायक ठरणार आहे. या प्रयोगशाळेत मनुष्याच्या बुद्धीचे आणि शारीरिक पोषण उत्तम रहाण्यासाठी या प्रयोगशाळेचे काम भविष्यात उपयुक्त ठरले.

    पुणे: एसएनडीटी महिला महाविद्यालयात महिलांना केवळ रोजगार मिळविण्यासाठी शिक्षण दिले जात नाही तर त्याद्वारे उच्चप्रतिचे महिलांचे सबलीकरण करण्याचे कार्य केले जाते. त्यांना उच्च शिक्षणासाठी आधुनिक संसाधने पुरविणे ही अभिनंदनीय बाब असून महिलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शासन सकारात्मक असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी सांगितले.

    आज पुण्याच्या एसएनडीटी महाविद्यालयाच्या होम सायन्स या शाखेच्या एमएससी क्लिनिकल पोषण आणि आहार तज्ञ या प्रयोगशाळेचे उद्घाटन दुरदृश्य प्रणालीद्वारे उपसभापती डॉ गो-हे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास माजी प्राचार्य एफ. झेड तारापोर, एसएनडीटी महाविद्यालयाच्या डॉ. मुक्तजा मठकरी, डॉ. अर्चना विश्वनाथन, डॉ. नलिनी पाटील, प्राध्यापक जुमाले, प्राध्यापक कुलकर्णी आदिंसह महाविद्यालयाचे प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थीनी आणि स्त्री आधार केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते. औरंगाबादचे प्रवीणा वालेकर यांनी या प्रयोगशाळेस अर्थसहाय्य केले आहे.

    महाविद्यालयातील होम सायन्स या विषयातील विद्यार्थीनी आज देशभर नव्हे तर जगभर कार्यरत आहेत. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थींनीसाठी एमएससी क्लिनिकल पोषण आणि आहार तज्ञ प्रयोगशाळा भविष्यात विद्यार्थ्यांना नक्कीच लाभदायक ठरणार आहे. या प्रयोगशाळेत मनुष्याच्या बुद्धीचे आणि शारीरिक पोषण उत्तम रहाण्यासाठी या प्रयोगशाळेचे काम भविष्यात उपयुक्त ठरले असे देखील डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. एसएनडीटी ने भविष्यात शैक्षणिक कामासाठी हाक मारली तर मी आणि महाविकासआघाडी सरकार आणि माझ्या कार्यालयाचे कर्मचारी यांचे संपूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. तसेच शाश्वत विकासाची उद्दिष्टांच्या दुसरे उद्दिष्ट यात भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे या अनुषंगाने काम करताना बाल व माता मृत्यू कमी करण्यासाठी उत्तम पोषण आहार तयार करण्यासाठी एस एन डी टी च्या प्रयोगशाळेने पुढाकार घेण्याची आवाहन देखील डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केले.