मित्रांनीच केली मित्राची हत्या

चाकण : जुन्या भांडणाचा राग मनात धरून चिडलेल्या मित्रांनीच मित्राची गळा चिरून अत्यंत निघृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकण लगतच्या काळूस (ता. खेड) गावच्या हद्दीतील पवळेवाडी ते जाचकवस्ती रस्त्यावर एका निर्जनस्थळी मंगळवारी (दि. १७) रात्री पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

चाकण : जुन्या भांडणाचा राग मनात धरून चिडलेल्या मित्रांनीच मित्राची गळा चिरून अत्यंत निघृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकण लगतच्या काळूस (ता. खेड) गावच्या हद्दीतील पवळेवाडी ते जाचकवस्ती रस्त्यावर एका निर्जनस्थळी मंगळवारी (दि. १७) रात्री पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. येथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून याप्रकरणी बुधवारी (दि.१८) तीन जणांच्या टोळक्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. अनिकेत प्रकाश पवळे (वय २१, रा. काळूस, ता. खेड) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील प्रकाश गणपत पवळे (वय  ४६, रा. पाटील वस्ती, काळूस) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. प्रकाश पवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी आकाश कदम व नकुल ज्ञानेश्वर कदम यांच्यासह त्यांच्या अन्य साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पतंगे, विजय जगदाळे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.