बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकवण्याच्या प्रयत्नातील फरार आरोपीस अटक

पुणे : बनावट कागदपत्रे तयार करून जमीन बळकवण्याच्या प्रयत्नातील फरार आरोपीस बिबवेवाडी पोलीसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार असताना त्याने पोलिसांवरच आरोप

पुणे : बनावट कागदपत्रे तयार करून जमीन बळकवण्याच्या प्रयत्नातील फरार आरोपीस बिबवेवाडी पोलीसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार असताना त्याने पोलिसांवरच आरोप केले होते. दरम्यान अश्या प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

सचिन बाळासाहेब जागडे (वय ३७, टिळेकरनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सचिन आयवळे (वय ४०) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन जागडे याच्यासह ५ जणांवर न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणूकीसह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सचिन आयवळे यांनी बिबवेवाडी येथे जागा खरेदी केली होती. परंतु सचिन जागडे याने त्या जागेचे बनावट कागदपत्रे तयार केली व ती जागा बलकवण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी यांना धमकवण्यास सुरुवात केली. तसेच त्या जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून ती जागा त्याची असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी वेगवेगळी बनावट कागदपत्रे तयार केली. हा प्रकार समजल्यानंतर फिर्यादी यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतु पोलिसांनी दिवणीबाब असल्याने त्यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली. न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांना गुन्हा दाखल करून (१५६/३) तपास करण्याचे आदेश दिले. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर सचिन जागडे हा पसार झाला होता. त्याने फरार काळातच पोलिसांवर आरोप केले होते. तसेच न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जमीन फेटाळला. यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान सचिन जागडे याच्याबाबतची माहिती बिबवेवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, परिमंडळ पाचचे उपायुक्त सुहास बावचे, सहायक आयुक्त सुनील कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.