शिक्रापुरात अपघात करून पळून जाणाऱ्यास अटक

वाहनाच्या धडकेत अज्ञात इसमाचा मृत्यू प्रकरण शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाबळ चौक या ठिकाणी नगर पुणे रस्त्यावर एका अज्ञात इसमाला गाडीची ठोस बसल्यामुळे अज्ञात इसमाचा मृत्यू झाला

 वाहनाच्या धडकेत अज्ञात इसमाचा मृत्यू प्रकरण
शिक्रापूर:
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाबळ चौक या ठिकाणी नगर पुणे रस्त्यावर एका अज्ञात इसमाला गाडीची ठोस बसल्यामुळे अज्ञात इसमाचा मृत्यू झाला असताना अपघाताची खबर न देता पळून जाणाऱ्यास शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाबळ चौकातील रक्षक हॉस्पिटलसमोर दहा जून रोजी रात्री दहाच्या सुमारास वाहनाच्या धडकेने एक इसम रस्त्यावर पडला असता त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी अपघात करणारे वाहन घेऊन वाहन चालक पळून गेला होता. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र सदर अज्ञात इसमाबाबत काहीही माहिती मिळाली नसल्याने अखेर शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अज्ञात इसमावर अंत्यसंस्कार केले. सदर गुन्ह्याचा तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार हे करत असताना सदर अपघात केलेल्या वाहनाची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार अपघात करणाऱ्या गणेश गोरक्ष सासवडे रा. हिवरे रोड देवखल मळा शिक्रापूर (ता. शिरूर) जि. पुणे यास अटक केली असता त्याने त्याच्या ताब्यातील एम एच १२ क्यू डी ७०७२ या फॉरच्युनर वाहनाने अपघात झाला असल्याचे कबूल केले आहे. अपघातातील अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांना लागला परंतु अज्ञात व्यक्ती बाबत काहीही माहिती मिळाली नसल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार हे करत आहे.