कंटेनरखाली घुसली पूर्ण भरधाव कार

शिरूरमध्ये भीषण अपघातात देखील दोघे सुखरूप
शिक्रापूर : शिरुर (ता. शिरुर) येथील नगर पुणे बाह्य महामार्गावर नाना ढाब्याजवळ चढावर कंटेनर बंद पडल्याने पाठीमागून भरधाव वेगात आलेली संपूर्ण कार कंटेनर खाली घुसून भीषण अपघात झालं मात्र या अपघातात कार मधील दोघे सुखरूपपणे बचावले असून देव तारी त्याला कोण मारी असे म्हणण्याची वेळ आली आहे.

शिरूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गाच्या बाह्य वाळणाहून हैदराबाद हून आलेला एन एल ०२ क्यू ८१५६ हा कंटेनर नगर बाजूनी पुणे दिशेने चाललेला होता परंतु चढावर कंटेनरचा घेर अडकून कंटेनर बंद पडल्याने रस्त्यावर उभा होता.

-कुठलीही जीवितहानी नाही झाली
यावेळी अचानक पणी पाठीमागून एम एच १२ पी टी ३२०५ ही कार भरधाव वेगाने आली आणि वेगाने कंटेनरच्या खाली हसली या वेळी संपूर्ण कारच कंटेनरखाली अडकली गेली आणि भीषण अपघात झाला. मात्र या अपघातामध्ये कारमधील दिव्या प्रसाद रोकडे (वय २३) रा. धनकवडी पुणे, सुजित अभयकुमार वायकोस (वय ३०) रा. लोणी काळभोर (ता. हवेली) हे दोघे या अपघातात जखमी झाले आहेत. या झालेल्या अपघातात कार कंटेनरच्या खालून आत मध्ये सहा ते सात फूट घुसून देखील कुठलीही जीवित हानी झाली नाही. याबाबत कंटेनर चालक राम पंढरी सांगळे (वय ३२) पारगाव (ता.धारूर) जि. बीड याने शिरूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे. या अपघातात कारच्या हुड पूर्णपणे तुटला गेले काही भाग दाबला गेला परंतु यातील एक महिला व एक पुरुष दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक वैभव मोरे हे करत आहे.