ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून बेवारसावर अंत्यसंस्कार

शिक्रापूर : येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या बेवारस इसमाचे नातेवाईक मिळून न आल्यामुळे सदर इसमावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न उभा राहिला असताना अखेर शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सदर अज्ञात इसमास मुखाग्नी देत अंत्यसंस्कार केले आहे.

                       शिक्रापूर (ता. शिरूर)  येथील पाबळ चौक येथील रक्षक हॉस्पिटल समोर पुणे नगर महामार्गावर एका अज्ञात इसमाला अज्ञात वाहनाची धडक बसून त्या इसमाचा मृत्य झाला होता. यावेळी शिक्रापूर पोलिसांनी सदर इसमाबाबत आजूबाजूला चौकशी केली असताना काहीही माहिती मिळाली नाही. यावेळी पोलिसांनी सदर इसमाचे वर्णनबाबत माहिती गावामध्ये प्रसारित केली. या इसमाच्या डाव्या हाताच्या दंडावर माया आणि पोटरीवर मीराबाई आणि उजव्या हातावर जय भीम असे नाव गोंधलेले असल्याचे आढळून आले. परंतु इसमाचे नातेवाईक अथवा काहीही माहिती मिळाली नसल्याचे  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांनी सांगितले, त्यानंतर सदर अज्ञात इसमाचे ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर येथे शवविच्छेदन करून मृतदेह शवागार गृहात ठेवण्यात आला, पुढील काही काळ मृतदेह शवागार गृहात ठेवणे शक्य नसल्याने पोलिसांनी सदर अज्ञात बेवारस इसमाचे अंत्यसंस्कार करण्याबाबतची विंनती ग्रामपंचायतकडे केली असता शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गायकवाड, विलास पवार, पप्पू चव्हाण, राजाराम मांढरे, योगेश केवटे, तुळजाराम माने, राहुल राजगुरू, धोंडीबा शिर्के यांनी अंत्यसंस्कार केले