gaganyan project

गगनयानाच्या (Gaganyan) उड्डाणासाठी लागणारे बूस्टर पुण्यातील वालचंदनगर (Walchandnagar ) कंपनीत तयार होणार आहे. बूस्टर (Booster)  उभारणीबरोबरच आता बूस्टरच्या गुणवत्ता चाचणीचाही प्रकल्प कंपनीने उभारल्याने अंतिम प्रक्षेपणापूर्वीच्या सर्व चाचण्या या कंपनीतच करता येणार आहेत.

पुणे : गगनयान (Gaganyan) ही भारताची पहिली मानवरहित अंतराळ (space mission)  मोहीम आहे. २०२० मध्ये ही मोहीम राबविली जाणार होती. मात्र, कोरोनामुळे गगनयानाचे प्रक्षेपण लांबले. असे असले तरी या मोहिमेचे सर्व प्रकल्प पुन्हा सुरू केले आहेत.गगनयानाच्या (Gaganyan) उड्डाणासाठी लागणारे बूस्टर पुण्यातील वालचंदनगर (Walchandnagar ) कंपनीत तयार होणार आहे. बूस्टर (Booster)  उभारणीबरोबरच आता बूस्टरच्या गुणवत्ता चाचणीचाही प्रकल्प कंपनीने उभारल्याने अंतिम प्रक्षेपणापूर्वीच्या सर्व चाचण्या या कंपनीतच करता येणार आहेत.

मुख्य यानाबरोबर हे यान अंतराळात पाठविण्यासाठी जीएसएलव्ही मार्क ३ या भारताच्या बाहुबली प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरचे निदेशक एस. सोमनाथ तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने या प्रकल्पाचे उद्घाटन १८ डिसेंबरला कंपनीच्या आवारात होणार आहे.

क्र्यू एस्केप सिस्टिमही करणार तयार

गगनयान मोहिमेच्या प्रक्षेपणादरम्यान एखादा अपघात झाल्यास अंतराळवीरांचा जीव वाचविण्यासाठी क्र्यू एस्केप सिस्टिमही कंपनीत तयार करण्यात येत आहे. यानाचा स्फोट झाल्यास आपोआप या यंत्रणेमुळे यानाचा अंतराळवीर असलेला भाग हा यानापासून दूर होईल. हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर असून त्याचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे.