तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा

यवत : यवत येथे चोरून सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर यवत पोलिसांनी छापा टाकून एकुण १३ जणांना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १,९२,४४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि.२४ऑगस्ट मध्यरात्री १.३० वाजता यवत येथील गराडे वस्ती येथील बाप्पा मोरया गणेश मंडळाच्या पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील बाजूला लाईटच्या उजेडात तीन पती जुगार चालू असल्याची खबर यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना कळताच यवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.के.कापरे, पोलिस काँन्सटेबल संतोष पंडित, एस.ए.लोखंडे,व्ही.बी.रासकर, व्ही. एम.गजरे, होमगार्ड पालखे,व शेळके,या पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता काही इसम गणपतीच्या पत्र्याच्या शेडच्या पाठीमागे मोकळ्या जागेत रात्रीच्या १वाजता लाईटच्या उजेडात गुर्प करून जुगार खेळताना आढळून आले.