कर्जत तालुक्यातील गणेशोत्सव असा असेल…

कर्जत : कर्जत तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कर्जत तहसील कार्यालयामध्ये संपन्न झाली यावेळी प्रांताधिकारी अर्चना नसते तहसीलदार नानासाहेब आगळे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड आदी उपस्थित होते. 

प्रशासनाने शासनाच्या सूचना सर्वांच्या निदर्शनास आणून देत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा मुर्ती मोठी नसावी, पर्यावरण पूरक व कृत्रिम तलाव निर्माण करावा, गर्दी टाळावी किंवा गणपतीचे पुढच्या वर्षी विसर्जण करावे, वर्गणीसाठी सक्ती नसावी व शक्यतो आरोग्य विषयक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, माहिती फलक लावण्यात यावेत, सकाळी संध्याकाळी आरतीच्या वेळी गर्दी टाळावी, वाद्याचा आवाज मर्यादित ठेवावा,परिसर सॅनिटाइज करावा, मास्कचा वापर करावा, कमीतकमी लोक हजर राहतील याची काळजी घ्यावी, आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाहीत.  सजावट ही साधेपणाने करावी, परिस्थिती ची जाणीव ठेवून परवानगी घेण्यात यावी अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रशासनाने दिला आहे. यावेळी जयश्री वाघमारे पोलीस पाटील, वैशाली तिरळे, कृष्णा अामृते,उदयसिंह मोरे, जयसिंग पाटील, हरी ओम कुलथे, यश नहार यांच्यासह तालुक्यातील अनेक गावचे गणेशोत्सव मंडळा चे पदाधिकारी उपस्थित होते मात्र कर्जत शहरातील अनेक मंडळाच्या प्रतिनिधीनी या बैठकीकडे पाठ फिरविल्याचे दिसत होते. .