पोलिसांत दिलेली तक्रार घे म्हणत टोळक्याची तरूणाला मारहाण

एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला झोपली असताना आरोपी दोन दुचाकींवरून आले. महिलेच्या घरात घुसून महिलेला उठविले आणि खुबचंद मंगतानी उर्फ बुगी आणि इतरांविरोधात दिलेली तक्रार खोटी आहे, असे आताच्या आता लिहून दे. नाही तर न्यायालयात येऊन प्रतिज्ञापत्र दे किंवा तक्रार मागे घे, अशी धमकी देत कानशीलात लगावली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

    पिंपरी : पोलीसात दिलेली तक्रार खोटी आहे, असे लिहून दे तसेच न्यायालयात येऊन तक्रार मागे घे, असे म्हणत चार जणांनी तरूणाला मारहाण केली. ही घटना पिंपरी येथे घडली. आकाश घोडके (रा. बौद्धनगर, पिंपरी), राकेश वाघमारे (रा. मिलींदनगर, पिंपरी), विकास किर (रा. सुभाषनगर, पिंपरी) आणि त्यांच्या एका साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला झोपली असताना आरोपी दोन दुचाकींवरून आले. महिलेच्या घरात घुसून महिलेला उठविले आणि खुबचंद मंगतानी उर्फ बुगी आणि इतरांविरोधात दिलेली तक्रार खोटी आहे, असे आताच्या आता लिहून दे. नाही तर न्यायालयात येऊन प्रतिज्ञापत्र दे किंवा तक्रार मागे घे, अशी धमकी देत कानशीलात लगावली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.