Crime

तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. प्रणव साथीदारांसह लोणी काळभोर गाव तसेच परिसरात कोयता व घातक शस्त्रने नागरिक, व्यापारी व इतरांना धाक दाखवत असे. तर मारहाण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने हप्ते वसुल करीत असल्याची माहिती मिळाली होती.

    पुणे : दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. लोणी काळभोर परिसरात त्यांची दहशत होती. परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी तडीपारीचे आदेश दिले आहेत.

    प्रणव भारत शिरसाठ (वय २०, रा. लोणी स्टेशन) अभिजित अभिमन्यू आहेरकर (वय २०, रा. लोणी काळभोर) आणि सौरभ गोविंद इंगळे (वय २१, रा. इराणी वस्ती लोणी स्टेशन लोणी काळभोर) अशी तडीपार केलेल्याची नावे आहेत.

    तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. प्रणव साथीदारांसह लोणी काळभोर गाव तसेच परिसरात कोयता व घातक शस्त्रने नागरिक, व्यापारी व इतरांना धाक दाखवत असे. तर मारहाण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने हप्ते वसुल करीत असल्याची माहिती मिळाली होती.त्यांची लोणी काळभोरसह येथील कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन भागात दहशत होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध नागरिक तक्रार करण्यास घाबरत असे.

    त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तिघांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना पाठविला. पाटील यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगार टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सराईतावर कडक कारवाई केली जात आहे.