आंतरजिल्हा मोटार सायकल चोरी करणारे टोळी जेरबंद ; बारामती शहर पोलिसांची कामगिरी , २० लाख रूपये किंमतीच्या १८ मोटार दुचाकी जप्त.

योगेश विलास चिरमे (वय २३ वर्षे,रा झारगडवाडी ता.बारामती जि.पुणे) याला ताब्यात घेऊन त्याच्यासह दोन विधीसंघर्षीत बालक असे तिघांना ताब्यात घेऊन न्यायालयाकडुन पोलीस कोठडी घेण्यात आली. त्यास पोलीस कोठडीत विश्वासात घेवुन त्याच्याकडील विधीसंघर्ष बालकाकडे चौकशी करता त्यांनी वरील गुन्हयातील मोटार सायकल नंबर (एम.एच.११सी.व्ही.५७४१) यासह आणखी बारामती शहर तालुका परीसर, फलटण,सासवड, दौंड अशा वेगवेगळया ठिकाणाहुन १७ अशा एकुण १८ चोरीच्या मोटार सायकली घेणारे गजानन दत्तु चव्हाण,निलेश ऊर्फ सोन्या ऊर्फ चिलम ऊर्फ उदय मोहन शेवगन दोन्ही (रा.अकोली वाडगाव ता.गंगापुर जि.औरंगाबाद) यांच्याकडून मोटरसायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

    बारामती : विविध ठिकाणावरुन दुचाकींची चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यास बारामती शहर पोलिसांना ‌‌यश आले असून या टोळीतील योगेश विलास चिरमे (वय २३) याच्यासह इतर दोघांना जेरबंद करून त्यांच्याकडून २० लाख रूपये किंमतीच्या १८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.याबाबतची माहिती अशी ‌की,सविस्तर माहिती अशी, बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतून बऱ्याच दुचाकींची चोरी झाली आहे , याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आलेला होता. परंतु तापसात लगेच यश मिळत नव्हते. यासंदर्भात पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या.

    त्याप्रमाणे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे, सहा.पोलीस उपनिरीक्षक शिवाजी निकम,दशरथ इंगोले, तुषार चव्हाण,अकबर शेख यांचे पथक तयार करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. ज्या ज्या ठिकाणावरून मोटार सायकली चोरीस गेल्या आहेत, त्या ठिकाणी तपास सुरू केला. तेथील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. त्यावेळी मोटार सायकल चोरून घेवून जात असताना अस्पष्ट व चेहरा लपवलेला इसम दिसला, त्या आधारे व तांत्रिक पुराव्या‌च्या आधारे माहिती गोळा करून

    आरोपी योगेश विलास चिरमे (वय २३ वर्षे,रा झारगडवाडी ता.बारामती जि.पुणे) याला ताब्यात घेऊन त्याच्यासह दोन विधीसंघर्षीत बालक असे तिघांना ताब्यात घेऊन न्यायालयाकडुन पोलीस कोठडी घेण्यात आली. त्यास पोलीस कोठडीत विश्वासात घेवुन त्याच्याकडील विधीसंघर्ष बालकाकडे चौकशी करता त्यांनी वरील गुन्हयातील मोटार सायकल नंबर (एम.एच.११सी.व्ही.५७४१) यासह आणखी बारामती शहर तालुका परीसर, फलटण,सासवड, दौंड अशा वेगवेगळया ठिकाणाहुन १७ अशा एकुण १८ चोरीच्या मोटार सायकली घेणारे गजानन दत्तु चव्हाण,निलेश ऊर्फ सोन्या ऊर्फ चिलम ऊर्फ उदय मोहन शेवगन दोन्ही (रा.अकोली वाडगाव ता.गंगापुर जि.औरंगाबाद) यांच्याकडून मोटरसायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

    सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते ,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे,सहा.पो.उपनिरीक्षक शिवाजी निकम,पो.कॉ.सुहास लाटणे,दशरथ इंगोले,तुषार चव्हाण,अकबर शेख,बंडु कोठे अजित राऊत, तसेच सायबर शाखा पुणे ग्रामीण सहा.पोलीस निरीक्षक मोहीते,चेतन पाटील, पोलीस हवालदार गोपाळ ओमासे होमगार्ड वायकर,मेमाणे,साळुंखे,यांनी केली .