धक्कादायक! पुण्यात मतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुण्यात मतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या तरुणीला भरदिवसा अपहरण करून नेले. तिच्यावर चौघांनी आळी पाळीने बलात्कार केला. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

    पुणे : सांस्कृतिक शहरात चौघांनी २५ वर्षीय मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

    श्रीकांत सरोदे (वय ३६), आदित्य पवार (वय १९), दुरवेश जाधव (वय ३६) आणि आशिष उर्फ रड्या मोहीते (वय १८) यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मतिमंद आहे. ती सातारा रोड परिसरात राहते. दरम्यान काल तिला आरोपींनी स्वारगेट परिसरातून जनता वसाहत येथे नेले. चौघांनी येथील बंद खोलीत नेहून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे
    पण या घटनेने पुण्यातप्रचंड खळबळ उडाली आहे.