धक्कादायक ! पुण्यात मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार

शुक्रवारी पीडितेला आरोपींनी स्वारगेट परिसरातून जनता वसाहत येथे नेले. चौघांनी येथील बंद खोलीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

    पुणे : सांस्कृतिक शहरात चौघांनी 25 वर्षीय मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

    श्रीकांत सरोदे (वय 36), आदित्य पवार (वय 19), दुरवेश जाधव (वय 36) आणि आशिष उर्फ रड्या मोहीते (वय 18) यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मतिमंद आहे. ती सातारा रोड परिसरात राहते. दरम्यान काल तिला आरोपींनी स्वारगेट परिसरातून जनता वसाहत येथे नेले. चौघांनी येथील बंद खोलीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पण या घटनेने पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.