देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मैदानावरील कचऱ्याची आता विल्हेवाट लागणार!

गेल्या काही दिवसांपासून तेथे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रुपीनगर तळवडे, यमुनानगर, निगडी परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरत होते. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.

    पिंपरी: देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील मोकळ्या मैदानावरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने घ्यावी. त्याबाबत तात्काळ कार्यवाही करुन नियोजन करण्यात येणार आहे. तशा हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

    भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत कचरा समस्येबाबत भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक शांताराम (बापू) भालेकर, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, शहर भाजप उपाध्यक्ष किरण पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष रामदास कुटे, शिरीष उत्तेकर, विशाल मानकरी, मनसे शहर उपाध्यक्ष अमोल भालेकर, शिवयोद्धा प्रतिष्ठान अध्यक्ष, रवी शेतसंधी, अनिल भालेकर, ऋषिकेश भालेकर, श्याम भालेकर, दिपक भालेकर व नागरिक उपस्थित होते.

    यावेळी रुपीनगर परिसरालगत असलेल्या देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मोकळ्या मैदानात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दितील कचरा टाकला जातो. परंतु, त्याचा त्रास आमच्या परिसरातील नागरिकांना होतो. गेल्या काही दिवसांपासून तेथे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रुपीनगर तळवडे, यमुनानगर, निगडी परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरत होते. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे या समस्येवर मार्ग काढण्याबाबत आमदार लांडगे यांनी महापालिका प्रशासनाकडे आग्रही मागणी केली आहे.