पुण्यात गॅसचा भीषण स्फोट, चार जण गंभीर जखमी

आज सकाळी एक महिला चहा बनवण्यासाठी गॅस सुरू करत असताना हा भीषण स्फोट झाला. वडगावशेरीच्या गणेशनगर भागातील या घटनेनंतर आजूबाजूच्या अनेक इमारतींना हादरे बसले. मात्र, या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे: पुण्यातील (Pune) वडगावशेरी येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे (Gas blast) इमारत कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना आज बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी एक महिला चहा बनवण्यासाठी गॅस सुरू करत असताना हा भीषण स्फोट झाला. वडगावशेरीच्या गणेशनगर भागातील या घटनेनंतर आजूबाजूच्या अनेक इमारतींना हादरे बसले. मात्र, या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी (four seriously injured) झाले आहेत.

या घटनेत आईवडील आणि मुलगी जखमी झाली आहे. येथील घराचे मोठे नुकसान झाले असून, मुलगी तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली आहे. बाळासाहेब भोंडवे, नीरा भोंडवे, अनुराधा भोंडवे आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यास सुरुवात केली आहे. तसेच येथील नागरिकांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांनाही खडगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच घरातील आग विझवत पडलेली भिंत बाजूला काढली जात आहे.