जेबीकेबी सोशल सोसायटीचे औदार्य व समता सैनिक दलाचे गरजूंना सहकार्य

रावणगाव:   लॉक डाऊन सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत जेबीकेबी सोशल सोसायटी चे गरजूंना मदतीचे कार्य अजूनही करत आहेत .

 रावणगाव:   लॉक डाऊन सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत जेबीकेबी सोशल सोसायटी चे गरजूंना मदतीचे कार्य अजूनही करत आहेत . सोशल सोसायटी कडून परिसरातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदत करण्याचे ठरवणाऱ्या नागपुरातील जेबीकेबी सोसायटी उपाध्यक्ष प्रा.माधुरी दुपटे गायधनी ,शिक्षक संघाच्या अध्यक्षा वंदना वनकर ,मृणाल दुपटे या प्रथम महिला असाव्यात.तेव्हा पासून आज पर्यंत जेबीकेबी सोशल सोसायटी चे मदत कार्य  सातत्याने सुरूच आहे.

सोसायटी तर्फे गरजूंना गव्हाचे पीठ,तेल, २ साबण ,तिखट, हळद,सोयाबीन वडी तुरीची डाळ या सर्व वस्तूंचे किमान ५ दिवस एका कुटुंबाला पुरेल एवढे पॅकेट तयार करून आतापर्यंत  इंदोरा कामगार  वसाहत, रामबाग ,हिंगणा,बेझनबाग, मांजरी कामठीरोड, नरसाळा  राधानगर ,शांतीनगर, कांचीपूरा,इमामवाडा, कैलाश नगर ,बजरंगनगर ,चंद्रमनीनगर ,खापरीकडील भटकी जमात ,बालाजीनगर ,रामटेके नगर ,मुस्लिम माहिलासंघ मोठा ताजबाग, शंकरपूर ,अजनी पोलीस स्टेशन समोरील कामगार अश्या एरियातील किमान १५०० लोकांपर्यंत मदत पोहचविण्यात आली. जेबीकेबीच्या या कार्यात रामबाग येथील समता सैनिक दल, पदाधिकारी नागसेन बडगे, तेथील महिला विंग हे यासाठी  फार मोठ्या प्रमाणात  परिश्रम घेत आहेत.  धान्याचे पैकेट तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी रामबाग मधील समता सैनिक महिला विंग  पार पाडीत आहे .याशिवाय भन्ते हर्षदीप, भन्ते अभय नायक, एम. एस.जांभुले ,स्मिता बडगे,पूजा मानमोडे ,वैभव वनकर,माजी शिक्षणाधिकारी ठमकेसाहेब
अतुल खोब्रागडे व बेकी एकी ची टीम, १९४२  महिला क्रांती परिषद यांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले आहे.