हॉटेल व्यवसाय पूर्णपणे सुरू करण्यास परवानगी मिळावी

नारायणगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावाने पुणे जिल्ह्यातील असंख्य लहान - मोठे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत . हॉटेल मालक व कामगार वर्ग हवालदिल झाला आहे . हॉटेल चालकांना पार्सल सुविधा पुरविण्यास

नारायणगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावाने पुणे जिल्ह्यातील असंख्य लहान – मोठे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत . हॉटेल मालक व कामगार वर्ग हवालदिल झाला आहे . हॉटेल चालकांना पार्सल सुविधा पुरविण्यास परवानगी दिली आहे. परंतु पार्सल सुविधेला म्हणावा असा प्रतिसाद मिळत नसल्याने हॉटेल व्यवसाय पूर्णपणे सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी फुड अँड ड्रग्ज कन्झूमर वेलफेअर कमिटीचे  पुणे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी राज्य शासनाकडे केली आहे .

हॉटेल व्यवसायीकांचे दि . २४ मार्च पासून खुप मोठे नुकसान झाले आहे .अडीच महिन्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत होण्याच्या मार्गावर असताना हॉटेल व्यवसायीकांना अजुनही हॉटेल सुरू करण्याची परवानगी मिळत नाही. काही हॉटेल व्यवसायीकांनी हॉटेलमधील कर्मचारी यांना आजपर्यंत संभाळले आहेत.  हॉटेल व्यवसायिकांना हॉटेलचे भाडे , लाईट बिल , कर्जाचे हप्ते , कामगारांचा पगार देणे ह्या परिस्थितीत शक्य होत नाही . महाराष्ट्रातील दारूची दुकाने सुरू होवू शकतात बाकी सर्व दुकाने व व्यवहार सुरू होवू शकतात परंतू हॉटेल व्यवसाय सुरू होवू शकत नाही हा हॉटेल व्यवसायीकांवर अन्याय आहे . हॉटेल व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी बांधवांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे . शेतकऱ्यांचा भाजीपाला , दुध ह्या गोष्टी हॉटेल व्यवसायास रोज गरजेच्या असतात . परंतू हॉटेल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल फेकून द्यावा लागतो . नोंदणीकृत हॉटेल व्यवसायिक शासनाला १० टक्के महसुल मिळून देतात मात्र या व्यवसायास आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारने कोणतीही उपाय योजना केलेली नाही . सर्व हॉटेल व्यवसायिक ग्राहकांच्या व हॉटेल मधील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मास्कचा वापर करणे ,ग्लोजचा वापर करणे , सॅनिटायझर वापरणे , थर्मल मिटरने ग्राहकांचे तापमान तपासने , दर २ तासांनी हॉटेलचे निर्जंतुकीकरण करणे , स्वच्छता राखणे , सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी संभाळण्यास तयार आहेत . म्हणून  

सुरक्षित अंतर पाळून २५ टक्के टेबल लावून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ. , जिल्हाधिकारी , पोलिस अधिक्षक , तहसिलदार , खासदार , आमदार यांचेकडे केलेली आहे .