आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव व पिंगळवाडी गावे कोरोनामुक्त ..

भिमाशंकर : राज्यासह जिल्हयात कोरोना विषाणूने थैमान घातले असतानाच आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव सारख्या मोठया लोकसंख्येच्या गावामध्ये कोरोना रूग्ण सापडल्याने तसेच पिंगळवाडी (लांडेवाडी) येथील व्यक्तिचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने प्रांतअधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ कार्यवाही झाल्याने काही दिवसांतच हि दोन्ही गावे कोरोना मुक्त करण्यात महसुल, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व पोलीस यंत्रणांच्या कार्याला यश आले आहे. मात्र नागरिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

पिंगळवाडी (लांडेवाडी) येथे दि. २६ मे रोजी ४२ वर्षिय पुरूषाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. पिंगळवाडी परीसरात भितीचे वातावरण झाले. तर घोडेगाव मधील पती, पत्नी व मुलगा एका कोरोना बाधित व्यक्तिच्या संपर्कात आल्याने आंबेगाव तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी लगेच या व्यक्तिंना भीमाशंकर हॉस्पीटल मंचर येथे तपासणीसाठी नेले. त्यावेळी पतीचा व मुलाचा अहवाल निगेटीव्ह आला आणि दि. २९ मे रोजी पत्नीचा (वय ३४) अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे घोडेगाव व परीसरामध्ये खळबळ उडाली. लगेच प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून २६ व २९ मे रोजी यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंना होमक्वारंटाइन केले. पोलीस यंत्रणेने जा-ये करणारे रस्ते बंद केले. आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांनी परिसरातील सर्व्हे केला.       
 
तसेच प्रांतअधिकारी जितेंद्र डुडी यांनी आपल्या आदेशान्वये खबरदारीची उपाययोजना म्हणून पिंगळवाडी (लांडेवाडी), घोडेगाव गावठाण, चिवलदरा व आंबेशेत प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आणि आजुबाजुचा पाच किलोमिटर परीसर बफर झोन केला. दि. ५ रोजी घोडेगाव व पिंगळवाडी (लांडेवाडी) येथील कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंना बरे वाटल्याने त्यांना रात्री घरी सोडण्यात आले.