घोडेगाव गावठाण, चिवलदरा व आंबेशेत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

भिमाशंकर: घोडेगाव परीसरामध्ये कोरोना बाधित व्यक्ति आढळल्याने घोडेगाव गावठाण, चिवलदारा व आंबेशेत हा भाग प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर घोडेगाव गावठाण, चिवलदरा व आंबेशेत हा भाग

भिमाशंकर: घोडेगाव परीसरामध्ये कोरोना बाधित व्यक्ति आढळल्याने घोडेगाव गावठाण, चिवलदारा व आंबेशेत हा भाग प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर घोडेगाव गावठाण, चिवलदरा व आंबेशेत हा भाग केंद्रस्थानी धरून पाच किलोमिटर परीसर क्षेत्र बफर क्षेत्र म्हणून दि. २९ रोजी पुढील आदेश येईपर्यंत घोशित करण्यात आले असल्याचा आदेश प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.   

घोडेगाव गावठाण, चिवलदरा व आंबेशेत या प्रतिबंधक क्षेत्रामध्ये कलम १४४ नुसार लोकांची हालचाल पुर्णतः बंद करून त्या क्षेत्राच्या सिमांची नाकाबंदी करणे तसेच या कार्यक्षेत्रात येणारे पेट्रोल पंप, बॅंक, रेशन दुकान आदि बंद राहतील. संबंधित क्षेत्रात जा-ये करण्यासाठी फक्त एकच गेट राहणार आहे. याभागामध्ये पुर्ण वेळ पोलीसांचे पेट्रोलींग राहणार आहे. तर बफर झोन क्षेत्रात येणा-या गावांमध्ये लोकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेणे. परंतु तेथे लोकांचे आवागमनावर अंशतः बंदी घालण्यात येणार आहे. 
प्रतिबंधक क्षेत्रातील ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बॅंक, शाळा, मंगल कार्यालय, समाजभवन आदि सार्वजनिक ठिकाणे, बस स्थानक, चौक, बाजारपेठ, गर्दीचे ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करणे. तसेच चेकपोस्ट वरून रोज येणा-या जाणा-या वाहनांवर निर्जंतूकीकरण फवारणी करणे. सर्व्हेक्षणा दरम्यान ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे प्रांतअधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेशाव्दारे संबंधित प्रशासकीय विभागांना सांगितले आहे.   
घोडेगाव गावठाण, चिवलदरा, आंबेशेत येथील प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांना अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या पुरवठा कामी मंडल अधिकारी योगेश पाडळे, तलाठी संजय गायकवाड, ग्रामपंचायत घोडेगाव यांची नियुक्ती केली आहे. तर वैदयकिय सेवा देण्यासाठी वैदयकीय अधिकारी डॉ. अशिष गिते प्राथमिक आरोग्य केंद्र घोडेगाव, आरोग्य सेविका जयश्री बोईने यांची नियुक्ती केली आहे. तर प्रचार व प्रसिध्दी देणे, भित्तीपत्रके व ध्वनीफित लावणे कामी ग्रामसेवक जनार्दन नाईकडे ग्रामपंचायत घोडेगाव व सर्व सदस्य, कर्मचारी यांची नियक्ती केली असून अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ कामकाजास सुरूवात करण्याचा आदेश तहसिलदार रमा जोशी यांनी दिला आहे.