प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोना काळात नागरिकांना भरमासाठ वीज बिले आली असून महावितरणने बील वसुलीसाठी नागरिकांकडे तगादा लावला आहे. एकाचवेळी वीज बील न भरल्यास कनेक्शन तोडले जात असून हे अत्यंत चुकीचे आहे. वीज बील भरण्यास मुदतवाढ द्यावी. बिलांचा भरणा करण्यासाठी टप्पे करुन द्यावेत.

    पिंपरी (Pimpari).  कोरोना काळात नागरिकांना भरमासाठ वीज बिले आली असून महावितरणने बील वसुलीसाठी नागरिकांकडे तगादा लावला आहे. एकाचवेळी वीज बील न भरल्यास कनेक्शन तोडले जात असून हे अत्यंत चुकीचे आहे. वीज बील भरण्यास मुदतवाढ द्यावी. बिलांचा भरणा करण्यासाठी टप्पे करुन द्यावेत. एकाही घरातील वीज कनेक्शन तोडू नये, अशी मागणी शिवसेना नगरसेवक, विधी समितीचे सदस्य अमित गावडे यांनी केली आहे.

    याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या निगडीतील कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चौधरी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक गावडे यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन होता. लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना मोठ्या प्रमाणात वीज बीले आली आहेत. बीले वाढीव असल्याचा सर्वांचाच आक्षेप आहे. महावितरणने बील वसुलीची मोहिम हाती घेतली आहे. अधिकारी वसुलीसाठी निगडी, प्राधिकरण परिसरात फिरत आहेत.

    नागरिकांकडे एकाचवेळी बील भरण्यासाठी एवढे पैसे उपलब्ध नाहीत. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे बिलांचा भरणा करण्यासाठी टप्पे करुन द्यावेत. टप्प्या-टप्याने वीज बीले घ्यावीत. एकाही घरातील वीज कनेक्शन तोडू नये अशी विनंती नगरसेवक गावडे यांनी निवेदनातून केली आहे.