काकडेंना विधानपरिषदेवर राज्यपालनियुक्त आमदारकी द्या

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची मागणी पिंपरी: ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी देण्याची मागणी ऑल

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची मागणी

पिंपरी: ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी देण्याची मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मराठवाडा विभागाध्यक्ष सुनील बनसोडे व पुणे जिल्हा युवक अध्यक्ष हिराकांत गाडेकर यांनी केली आहे.  प्रवीण काकडे हे सुस्वभावी असून, त्यांचे राज्यभरात मोठ्या प्रमाणात सामाजिक काम चालू आहे. अनेक जाती-शाखांमध्ये विखुरल्या गेलेल्या धनगर समाजाला एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले आहे. तसेच दऱ्याखोऱ्यातील मेंढपाळ बांधव, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. धनगर समाजाला शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक प्रवाहात आणण्यासाठी प्रवीण काकडे सतत प्रयत्नशील असतात. गेली अनेक वर्षे समाजातील वंचितांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन काकडे यांची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड करण्यात यावी, अशी मागणी सुनील बनसोडे व हिराकांत गाडेकर यांनी केली आहे.