‘मला हप्ते दे, मी इथला भाई आहे’ म्हणत टपरीचालकाला दिली जीवे मारण्याची धमकी

‘मला हप्ते दे. मी इथला भाई आहे’ असे म्हणून वैभव याने कोयता हवेत नाचवला. ‘तू माझ्याकडे पर्वा सिगारेटच्या पाकिटचे पैसे का मागितले, तुला आता दाखवतोच’ असे म्हणून वैभव याने टपरीमधील सामानाची नासधूस केली. या प्रकरणात पोलिसांनी वैभव गायकवाड, आदित्य संतोष चोथे, मिथुन उर्फ मितेश जाधव, सागर दिवे, सचिन उर्फ बॉण्ड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

    पिंपरी: सिगारेटचे पैसे मागणाऱ्या टपरी चालकाला कोयता, लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्याला मारण्याची धमकी दिली. टपरीतील सामान वास्तव्यास फेकून नासधूस केली. त्यानंतर ‘मला हप्ते दे. मी इथला भाई आहे. आम्हाला जे हप्ते देणार नाही, त्याची अशीच गेम करू’ अशी धमकी देत टपरीमधील पैशांवर दरोडा टाकल्याची घटना पवनानगर काळेवाडी येथे घडली आहे.

    ‘मला हप्ते दे. मी इथला भाई आहे’ असे म्हणून वैभव याने कोयता हवेत नाचवला. ‘तू माझ्याकडे पर्वा सिगारेटच्या पाकिटचे पैसे का मागितले, तुला आता दाखवतोच’ असे म्हणून वैभव याने टपरीमधील सामानाची नासधूस केली. या प्रकरणात पोलिसांनी वैभव गायकवाड, आदित्य संतोष चोथे, मिथुन उर्फ मितेश जाधव, सागर दिवे, सचिन उर्फ बॉण्ड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपक पोपट मुंगसे (वय २३) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

    फिर्यादी पोपट मुंगसे यांची पवनानगर, काळेवाडी येथे जोतिबा गार्डन जवळ मामा पान शॉप नावाची टपरी आहे. आरोपी वैभव याने बुधवारी मुंगसे यांच्या टपरीवर येऊन सिगारेट घेतली. त्याचे पैसे मुंगसे यांनी मागितले. त्या रागातून वैभव त्याच्या साथीदारांना घेऊन मुंगसे यांच्या टपरीवर आला. दिवसभराचा गल्ला सुमारे तीन हजार रुपये वैभव याने जबरदस्तीने काढून घेतले. कोयता फिरवरून रस्त्यावर दहशत निर्माण केली. ‘आम्हाला जे हप्ते देणार नाही त्यांची अशीच गेम करू’ अशी धमकी देत वैभव फिर्यादी मुंगसे यांच्या अंगावर कोयता घेऊन धावून आला. मुंगसे त्याला घाबरून पळून जात असता वैभवच्या साथीदारांनी त्यांचा पाठलाग करून लोखंडी रॉड हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.