हापुस आंब्याला शिवनेरी हापुस मानांकन द्या :  उपमुख्यमंत्री अजित पवार

भिमाशंकर : जुन्नर, आंबेगाव मध्ये पिकणा-या हापुस आंब्याला सन्मान देण्यासाठी शिवनेरी हापुस म्हणून मानांकन करून दया असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले.

 भिमाशंकर : जुन्नर, आंबेगाव मध्ये पिकणा-या हापुस आंब्याला सन्मान देण्यासाठी शिवनेरी हापुस म्हणून मानांकन करून दया असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले. 

 
        जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील आंबा उत्पादक अभिमन्यु काळे व इतर उत्पादकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जुन्नर तालुक्यातील नुकसानग्रस्त आंबा बागा पहाण्यासाठी आले असता हि मागणी केली होती.  निसर्गचक्री वादळामुळे पुणे जिल्हयात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजीत बैठकीत  अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला.  
 
         देवगड, रत्नागिरी कडील आंबा उत्पादक  घाटावरच्या आंब्याला हापुस मानत नाहीत. मात्र घाटावरचा आंबा सुध्दा देवगड, रत्नागिरीच्या तोडीस तोड आहे. कोकणातील हवामान व घाटावरचे हवामान यामुळे दरवर्षी कोकणातील आंबा संपल्यावर घाटावरचा आंबा सुरू होतो. त्यामुळे तो दुर्लक्षीत राहिला आहे व त्याला बाजार व्यवस्थित मिळत नाही. जर या आंब्याला शिवनेरी हापुस म्हणून मानांकन मिळाल्यास बाजारात त्याचे वेगळे स्थान तयार होईल, त्यातून त्याची मागणी वाढेल  व  आपोआपच आंबा उत्पादक शेतक-यांचा फायदा होईल तसेच आंबा बागा देखिल वाढतील यासाठी जुन्नर, आंबेगाव मधिल आंब्याला शिवनेरी हापुस म्हणून मानांकन करून दया असे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी विभागिय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले.
 
        कोकणातील आंब्याच्या विम्याची मुदत ३ जुन आहे तर घाटावरचा आंबाच ३ जुनच्या पुढे सुरू होतो.  जुन महिन्याच्या सुरुवातीला पडणा-या पावसामुळे आंबेगाव, जुन्नर मधिल आंब्याचे मोठे नुकसान होते यासाठी आंब्याच्या विम्याची मुदत ३० जुन पर्यंत वाढवावी अशी सुचना दिलीप वळसे पाटील यांनी केली.