Go around the world, finally the vaccine will be found in Pune; Supriya Sule slammed Prime Minister Narendra Modi

दुनिया घुम लो पुण्याच्या पुढे काही नाही. जगभर फिरलात तरीही लस शेवटी पुण्यातच सापडणार आहे. ती लस पुणेकरांनी शोधली आहे. अन्यथा म्हणायचे मीच शोधली असं म्हणत सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

पुणे : दुनिया घुम लो शेवटी लस पुण्यातच सापडणार आहे असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(supriya sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना(narendra modi) टोला लगावला आहे. सिरम आणि ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे. पंतप्रधान मोदी सिरमच्या लस निर्मितीचा आढावा घेत आहेत.

यावरुन सुप्रिया सुळेंनी पंतप्रधानांना चांगलाच टोला लगावला. तुमच्या इथे 1400 कोटी, 1500 कोटींच्या गप्पा चालतात. आमच्या दिल्लीत तर एक लाख कोटींच्या गप्पा असतात. या गप्पा कोण मारतं तुम्हाला चांगलं माहीत आहेच. आज आहेत ‘ते’ आपल्या पुण्यात असे म्हणत त्यांनी नाव न घेता पंतप्रधानांवर निशाणा साधला.

दुनिया घुम लो पुण्याच्या पुढे काही नाही. जगभर फिरलात तरीही लस शेवटी पुण्यातच सापडणार आहे. ती लस पुणेकरांनी शोधली आहे. अन्यथा म्हणायचे मीच शोधली असं म्हणत सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

दरम्यान, अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्यूटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे.