Ajit Pawar

घरो घरी जाऊन सुपर स्प्रेडरचा शोध घ्या तसेच नियम मोडणाणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे कडक आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा महाविद्यालय २८ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    पुणे : घरो घरी जाऊन सुपर स्प्रेडरचा शोध घ्या तसेच नियम मोडणाणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे कडक आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा महाविद्यालय २८ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यातही करोनाच्या नवीन प्रकाराची भीती व्यक्त केली जात आहे. पुण्यात पुन्हा कोरोना बळावणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जात असून, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

    शहरातील हॉटेल रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. या बैठकीत रात्री ११ ते पहाटे सहा या काळात पुन्हा संचारबंदी करण्यात लागू करण्यात आली आहे.

    कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, हॉटस्पॉट भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रभावी नियोजन करावे.

    प्रतिबंधित क्षेत्रे यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरी जाऊन सुपर स्प्रेडर ILI /SARI रुग्णांचे सर्वेक्षण करावे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या Flu सदृश्य रुग्णांची RTPCR तपासणी करणे बंधनकारक करावी. संपर्क शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे धोरण अवलंबवावे असे आदेश उपमुख्यमंत्रीनी दिलेत. नागरिकांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री अजित पवारांनी केले आहे.