दिलासादायक बातमी. ! आंबेगाव तालुक्यातील ”त्या” व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह

भिमाशंकर: शिनोली (ता. आंबेगाव) येथे घाटकोपर मुंबई येथुन आलेली ४९ वर्षे वयाची व्यक्ति कोरोना बाधित होती. आज दि. २८ रोजी या व्यक्तिचे पॉझिटीव्ह रिपोर्ट निगेटीव्ह आले असुन या व्यक्तिस वायसिएम पुणे

भिमाशंकर:  शिनोली (ता. आंबेगाव) येथे घाटकोपर मुंबई येथुन आलेली ४९ वर्षे वयाची व्यक्ति कोरोना बाधित होती. आज दि. २८ रोजी या व्यक्तिचे पॉझिटीव्ह रिपोर्ट निगेटीव्ह आले असुन या व्यक्तिस वायसिएम पुणे येथून सोडण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी सांगितले. 

तालुक्यात साकोरे, पिंगळवाडी (लांडेवाडी), वडगाव काशिंबे, गिरवली, जवळे, वळती व निरगुडसर या गावांमध्ये प्रत्येकी एक व्यक्ति कोरोना बाधित आढळून आली. फक्त शिनोली गावामध्ये सर्वाधिक जास्त तीन व्यक्ति कोरोना बाधित आढळून आल्या, आणि रूग्ण संख्या दहा झाली. दि. २८ रोजी शिनोली येथील एका व्यक्तिचा रिपोर्ट पॉझिटीव्हचा निगेटीव्ह आला असल्याने कोरोना बाधित व्यक्ति नऊ झाली. तसेच  तालुक्यातील बहुतेक संशयितांच्या नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले.