‘दस मे बस’ नागरिकांचा चांगला प्रतिसाद ; पाच दिवसांत साठ हजाराहून अधिक प्रवाशांनी घेतला लाभ

पीएमपीएलला तीन लाख रुपयांचे उत्पन्न

    पुणे : पीएमपीएमएलच्या पुण्यदशम बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. पाच दिवसांत या सेवेचा गेल्या पाच दिवसांत साठ हजाराहून अधिक प्रवाश्यांनी लाभ घेतला आहे. यातून पीएमपीएलला तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.शहरातील मध्यवर्ती भागांतील वाहतुक सुरळीत करण्यासाठी पीएमपीएलने दहा रुपयात दिवसभर एसी बस प्रवास सेवा देण्यासाठी ही बससेवा सुरू केली. याेजतेसाठी ५० मिडी सीएनजी एसी बसेसचे लोकार्पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात झाले हाेते. या योजनेला ‘अटल सेवा…शटल सेवा पुण्यदशम’ असे नाव दिले आहे. प्रत्येक दिवसाला या बससेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाश्यांची संख्या वाढत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात ९ मार्गांवर सुरु झालेल्या या योजनेचा आजपर्यंत ६० हजाराहून अधिक प्रवाश्यांनी लाभ घेतला आहे. गेल्या दाेन दिवसांत ही संख्या अठरा हजाराच्या घरात पाेचली अाहे. तीन मिनिटे ते चाळीस मिनिटे अशी वारंवारीता या बसेसची असून, पन्नास बसेसचा उपयाेग याकरीता केला जात आहे.

    हे आहेत बसमार्ग
    पुणे स्टेशन ते िशवाजीनगर (मार्ग : िजल्हाधिकारी कार्यालय, मनपा, लोकमंगल, वाकडेवाडी) , स्वारगेट ते िशवाजीनगर (मार्ग : शनिपार, अ.ब.चौक, मनपा, येताना मंडई), स्वारगेट ते पुणे स्टेशन ( मार्ग : एस पी कॉलेज, के सरीवाडा, अ.ब.चौक, फडके हौद ) स्वारगेट ते िशवाजीनगर ( मार्ग : एस पी कॉलेज, डेक्कन , फर्ग्युसन रस्ता, येताना जंगली महाराज रस्ता), स्वारगेट ते पुणे स्टेशन ( मार्ग : नाना पेठ, पॉवर हाऊस, के ई एम रुग्णालय ), स्वारगेट ते पुणे स्टेशन ( मार्ग : नाना पेठ, साेन्या मारुती चाैकए कमलानेहरू रुग्णालय, येताना कस्तुरे चाैक, माेमीन पुरा), महात्मा गांधी स्टॅंड – पुलगेट ते डेक्कन ( मार्ग : काशिवाडी, नाना पेठ, साेन्या मारुती चाैक, लक्ष्मी राेड, डेक्कन ), पुणे स्टेशन ते डेक्कन ( मार्ग : िजल्हाधिकारी कार्यालय, अपाेलाे चित्रपट गृृह, िशवाजी राेड, केसरीवाडा, डेक्कन ), पुणे स्टेशन ते डेक्कन ( मार्ग : वेस्टएंड, नाना पेठ, िसटी पाेस्ट, लक्ष्मी रस्ता).