कोरोना काळात मुलांसाठी ऑनलाइन मोफत संस्कार वर्गाला चांगला प्रतिसाद…

शुभांकर व सुकन्या वाघेरे ह्या बहीण भावांनी ठरवलं की आपण या मुलांसाठी संस्कार वर्ग सुरु करू तेही मोफत. यामध्ये मुलांना आपली संस्कृती, सण, महाराजांचा इतिहास, पोवाडे,अभंग, थोर पुरुषांच्या गोष्टी , योगा, मर्दानी खेळ शिकवायचं ठरलं. कोरोना मुळे संस्कार वर्ग ऑनलाइन घ्यायचं ठरलं, दर रविवारी सकाळी 10 ते 12 वर्ग चालू असतो. पहिल्या दिवशी 40 मुले होती आता ती संख्या 200 च्या वर गेली आहे.

    पिंपरी : व्हाट्स अप स्टेटस वरून सहजच गप्पा मारताना विषय निघाला, लहान-लहान मुले अर्थ न कळणारी गाणी वाकडी तिकडी तोंड करून विक्षिप्त हावभाव करून व्हिडिओ बनवतात न् पालकही आपली मुले अगदी जगावेगळं कायतरी करत आहेत अशा आवेशाने ते सोशल मीडियावर शेअर करतात. हे सगळं पाहून मनात विचार आला की यामध्ये कुणीही अभिमानाने मुलं शुभंकरोती, अभंग, स्तोत्र म्हणताना व्हिडिओ शेअर करत नाहीत. यातूनच शुभांकर व सुकन्या वाघेरे ह्या बहीण भावांनी ठरवलं की आपण या मुलांसाठी संस्कार वर्ग सुरु करू तेही मोफत. यामध्ये मुलांना आपली संस्कृती, सण, महाराजांचा इतिहास, पोवाडे,अभंग, थोर पुरुषांच्या गोष्टी , योगा, मर्दानी खेळ शिकवायचं ठरलं.

    कोरोना मुळे संस्कार वर्ग ऑनलाइन घ्यायचं ठरलं, दर रविवारी सकाळी 10 ते 12 वर्ग चालू असतो. पहिल्या दिवशी 40 मुले होती आता ती संख्या 200 च्या वर गेली आहे. मुले श्लोक, स्तोत्र व्यवस्थित मन एकाग्र करून म्हणतात , शिवाजी महाराजांच्या गोष्टी पोवाडे तर पूर्ण जोशात म्हणतात . पालकही त्यांना प्रोत्साहन देतात.आमच्या गुरुकुलमधील मुलांच्या व्हाट्स अप स्टेटस ला आता शुभंकरोती , मनाचे श्लोक दिसू लागलेत, हे पाहून आनंद होतो. ऑगस्ट महिन्यामध्ये या मुलांच्या स्पर्धा होणार आहेत. शुभांकर ला लहानपणासूनच आजोबा किसन भिसे यांनी वाचन, गोष्टी, टाळ वाजवून अभंग-लोकगीत गाणे, महाराजांच्या गड किल्यांच्या गोष्टी, माऊली- तुकोबारायांच्या गोष्टी सांगून या विषयाची आवड लावल्याने हे सगळं त्याच तोंडपाठ आहे.

    घरात ग्रंथ, ऐत्यासिक पुस्तकांचा खजिना आहे. शुभांकर वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असून या सगळ्या कामामध्ये त्याला मित्र राजेंद्र कुंभार व श्रावणी चौधरी सहकार्य करतात. याच मुलांना बरोबर घेऊन पुढे गड- संवर्धन उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.