शासकीय अधिकाऱ्यांंनी गैरकृत्यांवर लक्ष ठेवावे दिलीप वळसे पाटील यांची सूचना

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्याच्या वेगवेगळया शासकीय कार्यालयांमधून पैसे मागण्याच्या तक्रारी येत आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देखील कारवाई केली आहे. या गैरकृत्यांवर अधिकाऱ्यांंनी लक्ष ठेवा अन्यथा तुमची देखिल गय केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचा आढावा मंचर येथील शासकीय विश्रामगृहात घेतला गेला. त्यावेळी वळसे पाटील बोलत होते. यावेळी शरद बंॅॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पंचायत समिती सभापती संजय गवारी, प्रांत संजय डुडी, तहसिलदार रमा जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंम्पे, कार्यकारी अधिकारी व्ही. आर. नाईक, एच.एस.नारखेडे,गटविकास अधिकारी जालींदर पठारे, डॉ. सुरेश ढेकळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, लक्ष्मण डाके, एन.एन.घातुळे, टी.के. चौधरी आदि उपस्थित होते.  
-शासकीय विभागांनी नियमित कामे सुरू करावी
तालुक्यात माळीण सारखी धोकाग्रस्त गावे आहेत. या पाच गावांमध्ये किरकोळ उपाय योजना करण्यासाठी निधी मंजुर झाला आहे. मात्र ही किरकोळ दुरूस्ती आंम्हाला नको तर कायम स्वरूपी पुनर्वसन हवे अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे. यासाठी मंजुर असलेला निधी पुनर्वसनाला वापरला जावा, सरकारी कर्मचाऱ्यांंसाठी निवासस्थाने बांधण्यात आलेली आहेत. ही सर्व निवासस्थाने वापरण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांनी कर्मचाऱ्यांंना दयाव्यात. तसेच नादुरूस्त निवासस्थानांची पहाणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरूस्ती करावी. कोरोनाची काळजी घेत सर्व शासकीय विभागांनी आपली नियमित कामे सुरू करा. छोटी मोठी कामे अनेक दिवसांपासून रखडल्याने लोक फार त्रासले आहेत. कोरोना बरोबर या कामांना वेळ दया, आदि सूचना वळसे पाटील यांनी दिल्या.