एसटी कर्मचाऱ्यांच्या हलाखीकडे सरकारचे दुर्लक्ष

मंचर : सध्या राज्यभरातील लोकांना आपापल्या घरी सोडण्यासाठी सरकारने राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या वतीने एसटी बसची सुविधा उपलब्ध केली असली तरी एसटी कर्मचाऱ्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप एसटी कामगारांनी केला आहे.

 मंचर  : सध्या राज्यभरातील लोकांना आपापल्या घरी सोडण्यासाठी सरकारने राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या वतीने एसटी बसची सुविधा उपलब्ध केली असली तरी एसटी कर्मचाऱ्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप एसटी कामगारांनी केला आहे. पगार वेळेवर मिळत नसल्याने अनेक कामगांरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

राज्यभरातील एसटी मागील दीड महिन्यापासून बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगारही मिळाले नाही.पगाराअभावी
कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. एसटी प्रशासनाच्या बस मागील दीड महिन्यापासून ठप्प असल्याचा फटका महसुलात मोठी घट होण्यासाठी झाला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नाही.तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांना खूप कमी पगार असतो. हा पगारही वेळेवर होत नाही.त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सरकारच्यावतीने कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही. अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थितीही ढासळलेली आहे. अशा कर्मचाऱ्यांना सरकारच्यावतीने जीवनावश्यक वस्तू ही देण्यात न आल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे हाल होत असल्याचे पहावयास मिळत आहे. संबधीत एसटी चालक याला मास्क,सॅनिटायझर आणि वैद्यकीय तपासणी सोय आरोग्य विभागाने उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी एसटी चालकांनी केली आहे.