ग्रेडसेपरटर मे अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करा; आयुक्तांकडून विकास कामांची पाहणी

भक्ती-शक्ती पूल महिनाअखेरपर्यंत पूर्ण करुन वाहतुकीस खुला करावा. रावेत येथील पुलासाठीच्या उर्वरित जागेचे भूसंपादन करण्याला गती द्यावे. नगर रचना विभागामार्फत कार्यवाही पूर्ण करुन पुलाचे काम लवकरात-लवकर सुरु करावे. अर्बन स्ट्रीट रस्त्यांच्या मध्ये ग्रीन पॉकेटमध्ये वाढ करावी. जेणेकरुन पादचाऱ्यांंना चालताना शुद्ध हवा मिळेल.

  पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी बुधवारी शहरातील विकासकामांची पाहणी केली. बीआरटीएस विभागाकडील चालू असलेल्या पुलांच्या कामांची पाहणी केली. डांगे चौकातील ग्रेडसेपरटरचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करुन वाहतुकीस खुला करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

  ग्रीन पॉकेटमध्ये वाढ करावी
  आयुक्तांनी निगडीतील भक्ती-शक्ती पुलाच्या कामाची पाहणी करुन दौऱ्याला सुरुवात केली. रावेत रेल्वे पूल, मुकाई चौक टर्मिनल, नियोजित ताथवडे पूल, आकुर्डी स्टेशन परिसरीतील अर्बन स्ट्रीट रस्ते, डांगे चौक ग्रेड सेपरेटर, वाकड हिंजवडी नियोजित पूल, मेट्रो स्टेशन, साई चौक जगताप डेअरी ग्रेड सेपरेटर आणि नियोजित फ्री-वेची आयुक्त राजेश पाटील यांनी पाहणी केली. साडेअकरा वाजता दौऱ्याची सांगता झाली.

  जागेचे भूसंपादन करण्याला गती द्यावे
  भक्ती-शक्ती पूल महिनाअखेरपर्यंत पूर्ण करुन वाहतुकीस खुला करावा. रावेत येथील पुलासाठीच्या उर्वरित जागेचे भूसंपादन करण्याला गती द्यावे. नगर रचना विभागामार्फत कार्यवाही पूर्ण करुन पुलाचे काम लवकरात-लवकर सुरु करावे. अर्बन स्ट्रीट रस्त्यांच्या मध्ये ग्रीन पॉकेटमध्ये वाढ करावी. जेणेकरुन पादचाऱ्यांंना चालताना शुद्ध हवा मिळेल. ताथवडेतील नियोजित पुलाच्या जागेची पाहणी केली. नियोजित कामाचा आराखडा समजून घेतला. डांगे चौकातील ग्रेडसेपरटरचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करुन वाहतुकीस खुला करावा. भूमकर चौकामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांंसमवेत बैठक आयोजित करावी.

   कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात
  वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या महापालिका हद्दीतील स्टेशनच्या जागेची पाहणी केली.
  प्रकल्प चांगले आहेत. वाहतूक सुरळित होण्यास याची मोठी मदत होईल. यात ‘ग्रीन’ पॉकेटमध्ये वाढ करावी. शुद्ध हवा मिळेल. कामे प्रेक्षणीय होतील. याबाबत विचार करावा. या कामांची जाहिरात मोठ्या प्रमाणात करावी,अशा सूचना आयुक्त राजेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.