आठवडे बाजार सुरू करण्यास  ग्रामपंचायत संरपचाची नापसंदी

लोणी काळभोर : पुर्व हवेलीतील आठवडे बाजार चालु करण्यास उरुळी कांचन, लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या संरपचानी नापसंती दाखविली आहे.

 लोणी काळभोर :  पुर्व हवेलीतील आठवडे बाजार चालु करण्यास उरुळी कांचन, लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या संरपचानी नापसंती दाखविली आहे. 

 गेल्या ८३ दिवसापासून बंद असलेले गावपातळीवरील आठवडे बाजार पुन्हा सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल राम राम यांनी दिल्या होत्या.  आजपासून पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरू होणार आहे. मात्र, आठवडे बाजार भरत असलेल्या ग्रामपंचायतीपैकी काही अपवाद वगळता सर्वच मोठ्या ग्रामपंचातीच्या सरपंचानी या निर्णयाबद्दल नापंसती व्यक्त केली आहे. हवेलीमधील उरुळी कांचन, लोणी काळभोर या गावांच्या सरपंचानी, सध्याच्या काळात आठवडे बाजार सुरु करण्यास विरोध दर्शविला आहे. 
  "मिशन बिगीन अगेन" मोहिमेअंतर्गत जिल्हातील कंन्टेमेन्ट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) वगळता गाव पातळीवरील सर्व प्रकारचे आठवडे बाजार सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल राम राम यांनी दिले आहेत. आठवडे बाजारासाठी सध्या उपलब्ध असलेल्या जागांचा विचार करता सोशल डिस्टन्सिंग अथवा दोन विक्रेत्यांमध्ये पुरेशी जागा ठेवणे शक्यच होणार नाही. अशा परिस्थितीत आठवडे बाजार सुरु केल्यास, ग्रामीण भागातही काही दिवसात कोरोनाच्या फैलाव अधिक होईल, अशी भीती अनेक सरपंचानी  व्यक्त केली आहे.
   काही दिवसात कोरोनाची साथ पुर्णपणे आटोक्यात आल्यानंतरच आठवडे बाजार सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे उरुळी कांचनच्या सरपंच राजश्री वनारसे, उपसरपंच जितेंद्र बडेकर व लोणी काळभोरच्या सरपंच अश्विनी गायकवाड यांनी सांगितले. 
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तेरा मार्च रोजी गावपातळीवर भरणारे सर्वच प्रकारचे आठवडे बाजार बेमुदत बंद करण्याचे आदेश दिले होते.  जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी  रात्री उशीरा सर्वच आठवडे बाजार सुरु करण्याचे आदेश दिले होते. मात्र आठवडे बाजार सुरु झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या होऊ शकतो या भीतीने अनेक गाव कारभाऱ्यांनी आठवडे बाजार सुरु करण्यास नकार दिला आहे.