आजोबांच्या फणी डान्सवर आजीने उगारली काठी; अन् ठोकली आजोबांनी धूम

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंनी जगातील अपरिचित पात्रांना रातोरात स्टार बनविले आहे. यामध्ये रानू मंडल, बाबा का ढाबा वाले बाबा यासारख्या नवोदित सेलिब्रिटिजचा समावेश आहे. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामधील आजोबांचा फणी डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे संतापलेली आजीबाई आजोबांच्या मागे काठी घेऊन येते तेव्हा आजोबा कशी धूम ठोकतात, हे बघून हसून हसून पोट दुखायला लागेल.

पुणे (Pune).  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंनी जगातील अपरिचित पात्रांना रातोरात स्टार बनविले आहे. यामध्ये रानू मंडल, बाबा का ढाबा वाले बाबा यासारख्या नवोदित सेलिब्रिटिजचा समावेश आहे. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामधील आजोबांचा फणी डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे संतापलेली आजीबाई आजोबांच्या मागे काठी घेऊन येते तेव्हा आजोबा कशी धूम ठोकतात, हे बघून हसून हसून पोट दुखायला लागेल.

विनोद म्हणून का होईना पण नवरा बायकोला घाबरतो हे सांगण्यासाठी अनेक व्हिडिओ, मीम शेअर केले जातात. त्यात हा आजी आजोबांचा व्हिडिओ फॉरवर्ड होत आहे. आजीचा दरारा इतका आहे की नुसती चाहूल लागताच नाचण्यात दंग झालेले आजोबा तर्राट पळत सुटतात.

कोणत्यातरी कार्यक्रमामध्ये आजोबा डान्स करताना दिसतात. आजोबा दारु पिऊन नाचत असल्यासारखं दिसतं. डान्स ऐन रंगात आलेला असताना व्हिडिओच्या शेवटी आजोबा पळ काढताना दिसतात. तेव्हा मागून आजी हातात काठी घेऊन येताना दिसते. प्रचंड व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ वेगवेगळ्या कॅप्शनसह शेअर केला जात आहे. याला म्हणतात आजीचा दरारा असं म्हणत व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.