pune containment zone

पुण्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास कंटेन्मेंट झोनची संख्या वाढवण्यात येणार आहे. शहरात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातील कंटेन्मेंट झोनची संख्या १३ वर होती. मागील १५ दिवसांत पुण्यात कंटेन्मेंट झोनची संख्या कमी करण्यात आली आहे.

पुणे : पुण्यात कोरोनाचा (Corona Virus Outbreak) उद्रेक झाला होता. कोरोना संसर्गामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची (Corona Patient) वाढ झाली तसेच कोरोनामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात रुगणांचा मृत्यू  (Corona Death) झाला. परंतु कोरोनाला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना (preacautions)  केल्या त्याचा आता चांगले परिणाम पाहायला मिळत आहेत. पुण्यात कोरोनाच्या भयानक उद्रेकानंतर आता परिस्थिती पुर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसत आहे. पुण्यात कंटेन्मेंट झोनची (containment zones In pune) संख्या ५९ कंटेन्मेंट झोनवरुन आता ६ भागांत कंटेन्मेंट झोन ठेवला आहे. यावरुन पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसते आहे.

पुण्यात मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या प्रकणात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे शहरातील कंटेन्मेंट झोनची संख्या कमी करण्यात आली आहे. सध्या पुण्यातील कसबा पेठ, आंबेगाव, वानवडी, लोहगाव, फुरसुंगी आणि हडपसर हे भाग वगळता इतर भागातील कंटेन्मेंट झोनची संख्या कमी करण्यात आली आहे.