कोरोनामुळे थांबवलेलया वाहनांच्या ऑनलाईन नोंदणीला ‘ग्रीन सिग्नल’

राज्य शासनाने कडक निर्बंध लावल्याने प्रादेशिक परिवहन विभागानेही स्वतंत्र आदेश काढून फक्त ऑनलाईन कामकाज केले जाईल, अशा सुचना जारी केल्या. त्याशिवाय नविन वाहनांची नोंदणी सुद्धा थांबविण्यात आली होती. मात्र, परिवहन आयुक्तांच्या आदेशापुर्वीच खरेदी झालेली आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून खरेदी झालेल्या वाहनांची नोंदणी प्रलंबित असल्याने अशा वाहनांची नोंदणी करण्याची मागणी राज्यातील वाहन वितरकांनी केली होती.

    पिंपरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील गर्दी कमी करण्याच्या हेतूने नवीन खरेदी होणाऱ्या वाहन नोंदणीला १ मे पर्यंत ब्रेक लावण्यात आला होता. मात्र, शासन आदेशापूर्वी तसेच गुढीपाडवा सणानिमित्त विक्री झालेल्या वाहनांचे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे अशा वाहनांची नोंदणी करण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांनी दिल्या आहे. मोटार वाहन निरिक्षक वाहनांची पाहणी करणार नसून ऑनलाईन पद्धतीनेच या वाहनांची नोंदणी केली जाणार आहे.

    राज्य शासनाने कडक निर्बंध लावल्याने प्रादेशिक परिवहन विभागानेही स्वतंत्र आदेश काढून फक्त ऑनलाईन कामकाज केले जाईल, अशा सुचना जारी केल्या. त्याशिवाय नविन वाहनांची नोंदणी सुद्धा थांबविण्यात आली होती. मात्र, परिवहन आयुक्तांच्या आदेशापुर्वीच खरेदी झालेली आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून खरेदी झालेल्या वाहनांची नोंदणी प्रलंबित असल्याने अशा वाहनांची नोंदणी करण्याची मागणी राज्यातील वाहन वितरकांनी केली होती. त्यानुसार आता १३ एप्रिलपुर्वी खरेदी झालेल्या वाहनांची नोंद करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिवहन आयुक्तांनी तशी परवानगी दिली आहे.

    यामध्ये नविन वाहनांच्या चॅसिस आणि इंजिन क्रमांकाच्या आधारे वाहन विक्रेत्याने ऑनलाईन अर्ज फॉर्म क्रमांक २०२१ विमा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा वितरकांनी प्रमाणित केलेला अर्ज वाहन नोंदणीसाठी स्विकारला जाणार आहे. संपुर्ण अर्ज वाहन वितरकांना अर्जाची स्कॅन कॉपी कार्यालयाच्या ई – मेलवर पाठवायची आहे. तर वाहनांचे नोंदणी शुल्क आणि कर, वाहन ४.० प्रणालीवर भरुन, मोटार वाहन निरिक्षक आणि नोंदणी अधिकारी संगणकावर मान्यता देणार आहे.