कोरोना काळात चांगल्याप्रकारे काम करणाऱ्या योद्ध्यांचा पालकमंत्री भरणेंच्या हस्ते सन्मान

    निमसाखर : निरवांगी (ता.इंदापूर) येथे आरोग्य विभाग, अंगणवाडी व आशा सेविका यांनी कोरोना काळामध्ये चांगल्याप्रकारे आरोग्यसेवेचे काम केले. यामुळे या कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून निरवांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘ताई-दादा सप्ताह’निमित्त फेटा, शाल, श्रीफळ व पेरूचे झाड देऊन राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

    नुकतेच निरवांगी (ता इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व बारामतीचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ताई-दादा सप्ताहा’चे इंदापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    यावेळी इंदापूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, निरवांगी वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश विरकर, डॉ. निलेश हेगडकर, डॉ. दत्तात्रय मंडगुले, निरवांगी आरोग्य सहाय्यक राहुल देवकर, अतुल कांबळे, सुरेश कांबळे, उमेश गवळी, विठ्ठल पवार, समीर पोळ, रणजित रासकर, महेश रासकर, बापू करे, प्रशांत कांबळे यांच्यासह या भागातील आरोग्य कर्मचारी आशा सेविका व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.