वडगाव मावळ येथे दीड लाखांचा गुटखा जप्त

पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाने १ लाख ४९ हजार ६४७ रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित पान मसाला जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजता वडगाव मावळ येथे पोटोबा मंदिराजवळ करण्यात आली आहे.

पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाने १ लाख ४९ हजार ६४७ रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित पान मसाला जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजता वडगाव मावळ येथे पोटोबा मंदिराजवळ करण्यात आली आहे. दिलीप चंपालाल मुथा (वय ५४), चंपालाल चुनीलाल मुथा (दोघे रा. मामासाहेब खांडगे नगर, तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी संतोष शामराव सावंत (वय ३४, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुटखा, सुगंधित तंबाखूची विक्री करण्यासाठी बंदी असताना आरोपींनी त्यांच्याकडे गुटखा व पान मसाला विक्रीसाठी साठवून ठेवला. अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत १ लाख ४९ हजार ६४७ रुपयांचा माल जप्त केला.