गुटखा विक्रीचा प्रतिकात्मक फोटो
गुटखा विक्रीचा प्रतिकात्मक फोटो

पिंपरी : गुटखा विक्री साठी आलेल्या एक व्यक्ति कडून सांगवी पोलिसांनी पाच लाख २५ हजार ५० रुपयांचा गुटखा जप्त केला. पिंपळे गुरव परिसरात पोलिसांनी ही कारवाई बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजता केली असून गुटखा विक्रेत्याला अटक केली आहे.

पिंपरी : गुटखा विक्री साठी आलेल्या एक व्यक्ति कडून सांगवी पोलिसांनी पाच लाख २५ हजार ५० रुपयांचा गुटखा जप्त केला. पिंपळे गुरव परिसरात पोलिसांनी ही कारवाई बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजता केली असून गुटखा विक्रेत्याला अटक केली आहे. संजयचंद्र भूषणसिंग ठाकूर (वय ४५, रा. वडगावशेरी, पुणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई अरुण पांडुरंग नरळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथे एक व्यक्ती गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी ठाकूर याला ताब्यात घेतले. ठाकूर हा त्याच्या कारमधून गुटखा विक्रीसाठी आला होता. गुटखा खरेदीसाठी त्याने गर्दी करून कोरोनासाथीचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक वातावरण तयार केले. पोलिसांनी त्याच्याकडून पाच लाख २५ हजार ५० रुपये किमतीचा गुटखा जप्त करत त्याला अटक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.