नाशिकला जात असलेल्या टेम्पो मधुन २५ लाखांचा गुटखा जप्त- सामाजिक सुरक्षा विभागाची धड़क कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निपाणी येथून नाशिककडे एका आयशर टेम्पोमधून प्रतिबंधित गुटखा नेला जात असल्याची माहिती पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाकड येथे थेरगाव फाटा चौकात सापळा लावला. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी एका आयशर टेम्पोला अडवून झडती घेतली.

पिंपरी: पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने वाकड येथे निपाणीहून नाशिककडे निघालेल्या एका टेम्पोला वाकड परिसरात सापळा लावून पकडले. त्या टेम्पो मध्ये तब्बल २५ लाख रुपयांचा गुटखा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी टेम्पोसह ३४ लाख २५ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी संध्याकाळी थेरगाव फाटा चौक, वाकड येथे करण्यात आली.

या प्रकरणी झुबेर लियाकत बाडीवाले (वय २५, रा. सावंतवाडी, सिंधुदुर्ग), शमशुद्दीन शेख (वय ३९, रा. अंधेरी रोड, मुंबई) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस नाईक नितीन लोंढे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निपाणी येथून नाशिककडे एका आयशर टेम्पोमधून प्रतिबंधित गुटखा नेला जात असल्याची माहिती पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाकड येथे थेरगाव फाटा चौकात सापळा लावला. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी एका आयशर टेम्पोला अडवून झडती घेतली. त्यामध्ये तब्बल लाखो रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला, तंबाखू गुटखा आढळून आला.

पोलिसांनी टेम्पोसह ३४ लाख २५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी टेम्पोमध्ये एक तलवार ठेवली असल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी याबाबत देखील गुन्ह्यात कलमवाढ केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.