शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकलेला गुटखा ४१ लाखांचा

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण रोड परिसरातील मांढरे वस्ती परिसरात शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत अवैध्यरित्या साठविलेला गुटखा साठा जप्त केला असताना सदर गुटखा तब्बल एक्केचाळीस लाख रुपयांचा असल्याचे निष्पन्न झाले असून अन्न व औषध विभागाकडून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण रोड मांढरे वस्ती परिसरात एका इमारतीमध्ये अवैध्यरित्या गुटख्याचा साठा केल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली. त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस नाईक तेजस रासकर, रविकिरण जाधव, अंबादास थोरे, अशोक केदार, विकास मोरे यांसह आदींनी त्या ठिकाणी जात छापा टाकला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा साठा मिळून आला होता. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे येत सदर जप्त गुटख्याचा पंचनामा केला असता त्यामध्ये वेगवेळ्या प्रकारचा विक्रीस बंदी असलेला पानमसाला, सुगंधित सुपारी, विमल पान मसाला असा तब्बल ४१ लाख ७२ हजार ६२८ रुपये किमतीचा गुटखा मिळून आला आहे. तर यावेळी शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संदीप गुप्ता याचेकडे चौकशी केली असता सदर गुटखा त्याच्या मालकीचा असून त्याने भाड्याने घेतलेल्या खोलीमध्ये त्याने गुटखा साठा केल्याचे कबुल केले. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती व्ही बारवकर रा. औध पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संदीप उमाशंकर गुप्ता रा. मांढरे वस्ती शिक्रापूर (ता.शिरूर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके हे करत आहे.

– गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे काय?
शिक्रापूर पोलिसांनी गुटखा साठ्यावर छापा टाकून कारवाई करत लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला असतानात्य ठिकाणी गुटखा वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी पूर्ण बंद पिकअप वाहने देखील जप्त केले आहेत, मात्र गुन्हा दाखल करताना वाहनांचा कोठेहि उल्लेख नाही त्यामुळे गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.

– गुटखा विक्रीच्या कारवाई कडे लक्ष?
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे गुटखा साठ्यावर कारवाई करून नावलौकिक मिळविणारे पोलीस आता परिसरातील इतर गुटखा विक्रीवर देखील कारवाई करणार असल्याचे बोलत आहे. त्यामुळे आता परिसरातील इतर गुटखा विक्रीच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.