भिगवण परिसरात पावसाचा हाहाकार : पाझर तलाव फुटला ; शेकडो हेक्टर जमीन वाहून गेली

भिगवण : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून इंदापुर तालुक्यातील मदनवाडी गावचा तलाव फुटल्याने तलावाच्या शेजारील एक घर वाहून गेले आहे. तलावाच्या खालील २०० हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून उस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे

भिगवण : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून इंदापुर तालुक्यातील मदनवाडी गावचा तलाव फुटल्याने तलावाच्या शेजारील एक घर वाहून गेले आहे. तलावाच्या खालील २०० हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून उस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांची जनावरे पुराच्या पाण्यात वाहुन गेली आहेत. मदनवाडी तलावाचे खोलीकरण करण्यात आल्याने १५० हेक्टरच्या तलावात अधिकचे पाणी साठले होते. रात्री पावसाचा जोर वाढल्याने तलाव तलावाच्या भराव्याची ५० ते ६० फुट भिंत वाहुन गेल्याने मदनवाडी ओढ्याच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

भिगवण जिल्हा परिषद गटाचे सदस्य हनुमंत बंडगर यांनी फुटलेला तलावाच्या ठिकाणी भेट दिली असून यावेळी त्यांच्या बरोबर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे विभागीय कृषी अधिकारी ताटे ग्रामपंचायत सदस्य गणपत ढवळे आबासाहेब बंडगर उपस्थित होते.

उस पिकाला हेक्टरी ५० हजार रुपये तर रब्बी पिकांना २० हजार रुपये हेक्टरी मदत करावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हनुमंत बंडगर म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करावेत आणि मदत करावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचेही बंडगर यांनी यावेळी सांगितले.