अर्ध्या पुणेकरांचे लसीकरण झाले पूर्ण! ; १८ लाखाहून अधिक लोकांना लस

-सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांची माहिती , दररोज सरासरी ५० हजार नागरिकांचे लसीकरण

  पुणे : कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. परंतु लसीकरणात अडचणी आल्यामुळे त्याचा वेग मंदावला होता. या सर्व समस्या असूनही पुण्यातील निम्म्या लोकसंख्येला लस देण्यात आली आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रांद्वारे सुमारे १८ लाख ६७ हजार ६५२ लोकांना लस देण्यात आली आहे. २५ जूनपासून दररोज सरासरी ५० हजाराहून अधिक लोकांना लस दिली जात आहे. अशी माहिती महापालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी दिली.

  – शहराची अधिकृत लोकसंख्या ३४ लाख
  कोरोनाचा कहर संपण्याचे नाव घेत नाही. उलट कोरोनाचे नवीन व्हेरीयंट समोर येत आहेत. आता तिसऱ्या लाटेची भीतीही व्यक्त केली जात आहे. ती रोखण्यासाठी सरकार आणि पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत लसीकरण करणे हे कोरोनाला रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिका जलद लसीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. डॉ वैशाली जाधव म्हणाल्या की, जवळपास निम्म्या शहराचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कारण महानगरपालिका क्षेत्राची अधिकृत लोकसंख्या ३४ लाख आहे. सुमारे १८ लाख ६७ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

  – वाढत्या केंद्रांमुळे लसीकरणाला गती
  डॉ.जाधव म्हणाल्या की, पालिकेने १८ लाख पैकी १४ लाख ३५ हजार ७७४७ नागरिकांना प्रथम डोस दिला आहे. तर ४ लाख ३१ हजार ९०५ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. पुण्याच्या लोकसंख्येनुसार, ५०% पेक्षा जास्त लसीकरण केले गेले आहे. महापालिकेकडून लसीकरण केंद्रांची संख्या सातत्याने वाढविली जात आहे. ज्यामुळे लसीकरणाची गती वाढत आहे. २६ जून रोजी शहरात ५१ हजार नागरिकांना लस देण्यात आली. तर ३ जुलै रोजी ५४ हजार नागरिकांना लस देण्यात आली. याला आणखी वेग देण्याचा प्रयत्न पालिका करीत आहे.

  १८ लाखांपैकी सुमारे १४ लाख ३५ हजार ७४७ नागरिकांना प्रथम डोस देण्यात आला आहे. तर ४ लाख ३१ हजार ९०५ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. पुण्याच्या लोकसंख्येनुसार, ५०% पेक्षा जास्त लसीकरण केले गेले आहे. म्हणजेच निम्म्या शहराचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

  डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी