Hapus's wait was over; Rates out of the general budget

मार्केटयार्डमधील आंब्याचे अनेक व्यापारी मागील वर्षांपासून कोकणातील रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची विक्री करतात. यावर्षी मार्केटयार्डमध्ये आंब्याची पहिली पेटी जानेवारी महिन्यामध्ये आली होती. पंचवीस हजार रुपये इतका तिचा भाव होता. त्यानंतर मार्केटयार्डमध्ये हळूहळू आंब्याची आवक होत गेली आणि किमतीतही घट झाली.

    पुणे : दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की आंब्याच्या आगमनाची उत्सुकता सर्वांनाच असते. परंतु ही उत्सुकता आता संपली असून पुण्यातील मार्केटयार्डमध्ये कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबा दाखल झाला आहे.

    मार्केटयार्डमधील आंब्याचे अनेक व्यापारी मागील वर्षांपासून कोकणातील रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची विक्री करतात. यावर्षी मार्केटयार्डमध्ये आंब्याची पहिली पेटी जानेवारी महिन्यामध्ये आली होती. पंचवीस हजार रुपये इतका तिचा भाव होता. त्यानंतर मार्केटयार्डमध्ये हळूहळू आंब्याची आवक होत गेली आणि किमतीतही घट झाली.

    सद्यस्थितीत चार ते सहा डझनच्या कच्चया आंब्याच्या पेटीसाठी तीन ते चार हजार रुपये इतका दर सुरू आहे. आंबा पिकल्यानंतर हे भाव आणखी वाढतात. एकतर कोरोनाचा संसर्ग आणि दुसरीकडे आंब्याच्या किमती जास्त असल्याने सध्या खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येत नाही, असे या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.