लग्नामध्ये सोनसाखळी दिली नसल्याने छळ ; सासरच्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर, चेन्नई आणि जर्मनी येथे ५ जून १४ ते १० मार्च २१ या कालावधीत हा प्रकार घडला.विवाहित महिलेने या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २६) फिर्याद दिली आहे.

    पिंपरी : लग्नामध्ये सोनसाखळी दिली नाही म्हणून शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करून विवाहितेचा मानसिक तसेच शारीरिक छळ केला. सासरच्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर, चेन्नई आणि जर्मनी येथे ५ जून १४ ते १० मार्च २१ या कालावधीत हा प्रकार घडला.विवाहित महिलेने या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २६) फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवाहितेचा पती महेश व्यंकटरमन, सासरे व्यंकटरमन गोबीचेट्टी, सासू क्रिष्णवेणी व्यंकटरमन (सर्व रा. स्टार्नबेर्ग, जर्मनी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.