पैशांसाठी विवाहितेचा छळ; पती, सासूवर गुन्हा

गणेश फुलचंद परदेशी (वय २६), सासू पुष्पा फुलचंद परदेशी (वय ६५, दोघे रा. तळेगाव - दाभाडे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गणेश याचे अनेक महिलांबरोबर संबंध होते. याचा जाब विवाहितेने विचारल्याने त्याने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली.

    पिंपरी : अनेक महिलांबरोबर असलेल्या अनैतिक संबंधाबाबत विवाहितेने पतीला जाब विचारल्यामुळे पतीने मारहाण करत माहेराहून पैसे घेऊन ये नाहीतर नांदवणार नाही, असे म्हणत छळ केला. हा प्रकार तळेगाव – दाभाडे येथे घडला.

    गणेश फुलचंद परदेशी (वय २६), सासू पुष्पा फुलचंद परदेशी (वय ६५, दोघे रा. तळेगाव – दाभाडे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गणेश याचे अनेक महिलांबरोबर संबंध होते. याचा जाब विवाहितेने विचारल्याने त्याने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. तुझ्या आईकडून पैसे घेऊन ये नाहीतर तुला नांदवणार नाही, अशी धमकी देत मानसिक आणि शारिरीक त्रास दिला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.