साखरपुड्यात मानपान न केल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी साखरपुड्याच्या वेळी सासरच्या लोकांना योग्य मानपान दिला नाही. तसेच सासरच्या लोकांची अपेक्षा पूर्ण केली नाही, या कारणावरून विवाहितेचा छळ केला.

    पिंपरी: साखरपुड्याच्या कार्यक्रमात वेळी सासरच्या लोकांचा योग्य मानपान केला नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याची घटना श्रीधरनगर चिंचवड येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अक्षय संजय देठे (वय ३३,) संजय प्रेमचंद देठे (वय ५९), अनिता संजय देठे (वय ५५, सर्व रा. श्रीधरनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडित विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

    विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी साखरपुड्याच्या वेळी सासरच्या लोकांना योग्य मानपान दिला नाही. तसेच सासरच्या लोकांची अपेक्षा पूर्ण केली नाही, या कारणावरून विवाहितेचा छळ केला. तसेच ‘तू आमच्या घरात राहायचे नाही. तू निघून जा. तुला आम्ही इथे राहू देणार नाही. तू कशी राहते हे पाहतो, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. पती अक्षय याने दररोज दारू पिऊन विवाहितेचा शारीरिक छळ केला. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.